आठवडे बाजारातून एकाची दुचाकी लांबविली; धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील आठवडे बाजार परिसरातून एकाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत सोमवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, दिलीप सरदार पाथरवड (वय 53 रा.वाघळूद खुर्द ता. धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मिस्तरी काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार २२ डिसेंबर रोजी धरणगाव शहराचा आठवडे बाजार असल्या कारणामुळे ते बाजार घेण्यासाठी दुपारी २ वाजता त्यांची दुचाकी (एमएच १९ डीडी ६५२३) ने धरणगाव शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी आठवडे बाजाराच्या परिसरात पार्किंगला लावली. दुपारी ३ वाजता बाजार करून परत आल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवार १९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील यांनी हे करीत आहे.

Protected Content