पॉवर लिफ्टिंग स्पर्धा उत्साहात 

 

फैजपूर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दि. 18 ते 19 डिसेंबर रोजी रावेर येथे झालेल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव झोन व इंटर झोनल पॉवरलिफ्ट, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस स्पर्धा पुरुष पॉवर लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या.

त्यात विद्यापीठातील तसेच अनेक जिल्ह्यामधून लिफ्टर सहभागी झाले होते. या स्पर्धेत लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी, फैजपूर मधील बी. फर्मसी अभ्यासक्रमाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी “यश खाचणे” याने 105 किलो वजन गटात, बेंच प्रेस मध्ये 240 किलो, 240 किलो डेडलिफ्ट 250 किलो स्क्वॉट प्रकारात वजन उचलुन आपली जागा महाविद्यालयातील संघात स्थान मिळवले आहे.

या यशाबद्दल माननीय लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी विद्यालयाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी अभनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शभेच्छा दिल्यात तसेच प्राचार्य प्रा. डॉ. विजय रघुनाथ पाटील यांनी पुढील खेळाच्या वाटचालीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधांचे पूर्तता सुनिश्चित करत पुढील मार्गदर्शन केले. फैजपूर येथील कोच सचिन श्रीकृष्ण राणे व गाईडन्स गौरव पाटील यांच्या आधारे सुवर्ण पदक प्राप्त केले.

तसेच प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील हे प्रत्येक विद्यार्थी व खेळाडूला सर्व सुविधा व कोचिंग रीतसर पुरवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात त्यामुळेच मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी फैजपूर येथे विद्यार्थ्यांचा खेळ व क्रीडा स्पर्धांकडे ओढा वाढत आहे.

Protected Content