नागपूर येथील मोर्चासाठी पाचोऱ्यातून पोलिस पाटील रवाना

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नागपूर येथील विधानसभेवर पोलीस पाटीलांचा लाखोंच्या संख्येने होत असलेल्या मोर्चासाठी पाचोऱ्यातुन पोलीस पाटील बांधव रवाना झाले आहेत. या मोर्चास कॉंग्रेसने पाठींबा दिला आहे.

महाराष्ट्रातील पोलीस पाटील बांधव आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २१ रोजी नागपूरात धडकत असुन लाखोंच्या संख्येने पोलीस पाटील बांधव सामिल होत आहे. यात पाचोरा रेल्वे स्थानकावरुन तालुक्यातील पोलीस पाटील बांधव मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. या मोर्चाला पाठींबा देत कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी पोलीस पाटील बांधवांना रवाना करण्यासाठी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी म्हणाले की, विधानसभेत आमदारांच्या मानधन पासून सेवानिवृत्ती पेन्शन, चालक, स्विय्य सहाय्यक अशांचे मानधन एकमताने मंजूर करण्यात येते मग पोलीस पाटील यांचे मानधन महागाई च्या दुनियेत तुटपुंज्या स्वरूपाची का ? सन – १९६७ च्या कालबाह्य कायद्यात तात्काळ बदल होणे क्रमप्राप्त आहे याकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे अशी मागणी कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी करत पोलीस पाटील यांच्या मोर्चाला पाठींबा दिला आहे.

यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा संघटक विनोद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम तेली, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, नितीन जमदाडे, एकनाथ कोळी, सह जवळपास ५० हुन अधिक पोलीस पाटील रवाना झाले आहे.

Protected Content