संरक्षण भिंतीच्या कामात माती मिश्रीत रेतीचा वापर !

पहूर, जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर कसबे येथील स्मशानभूमी येथील संरक्षण भिंतीचे काम मातीमिश्रीत रेतीने सुरू असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून गटविकास अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे अश्या मागणीसह कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावण्याची मागणी केली जात आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील स्मशानभूमी येथील चांगले संरक्षण भिंतीचे काम करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांमधून केली जात होती. पहूर कसबे येथील स्मशानभूमी येथील संरक्षण भिंतीचे काम काही दिवसांपासून सुरू करण्यात आले असून चक्क त्या संरक्षण भिंतीच्या कामाला मातीमिश्रीत रेती वापरली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

यामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने संरक्षण भिंतीचे काम ईस्टीमेट प्रमाणे होत आहे का ? कोणत्या योजनेतून हे काम सुरू आहे ? किती रूपयांचे हे काम सुरू आहे ? या कामाचा ठेकेदार कोण आहे ? कोणत्या अधिकार्‍याच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे ? संरक्षण भिंतीच्या कामाला वापरली जाणारी विट चांगली आहे का ? यासह आदी प्रश्नांचा समावेश आहे. याकडे लक्ष देवून, कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई जामनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांनी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावा

कोणत्या योजनेतून काम सुरू आहे ? किती रूपयांचे काम आहे ? , काम सुरू करण्याची तारीख, कामाची कालमर्यादा, कोणत्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहेत त्याचे नाव, कोणत्या अधिकार्‍याच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहेत त्यांचे नाव, यासह आदी माहिती फलकावर असावी व ते माहीत फलक कामाच्या ठिकाणी लावावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून केली जात आहे.

पहूर कसबे गावात किती विकास कामे झाले ?

दरम्यान, वर्षभरात जामनेर तालुक्यातील पहूर कसबे गावात झालेल्या विकास कामांच्या ठिकाणीही माहिती फलक लावण्यात यावेत कारण आपल्या पहूर कसबे गावात कोणते विकास कामे किती रुपयांचे झाले आहेत याची माहिती सर्व नागरिकांना व्हावी यासाठी हे माहिती फलक लावावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे.

Protected Content