पहूरच्या ग्रामीण रूग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील ग्रामिण रुग्णालयात आज कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.

पहूर येथे ग्रामीण रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन .एस . चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ .राजेश सोनवणे, पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ . हर्षल चांदा , वैद्यकिय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात ३४ बिन टाक्याच्या तर ६ टाक्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

प्रारंभी डॉ. हर्षल चांदा यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांचे स्वागत केले. या वेळी आरोग्यदूत अरविंद देशमुख, रामेश्‍वर पाटील, शरद बेलपत्रे, मनोज जोशी, शंकर भामेरे, डॉ. संभाजी क्षीरसागर, रविंद्र घोलप आदींची उपस्थिती होती .

यशस्वीतेसाठी आशा सेविका अनिता शिंदे , विजया जाधव, सरिता पाटील ,भारती तायडे ,शोभा बारी , निर्मला पवार , योगिता परदेशी , पर्यवेक्षक बी .बी . काटकर , सरोज बेडसे, रेखा कुंभार, ऋषिकेश भालेराव ,दीपक वाघ, राहुल जाधव, देवेंद्र घोंगडे, आर. बी. पाटील, अशोक सुरवाडकर यांच्यासह पहूर ग्रामीण रुग्णालय वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शेंदुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले.

Protected Content