
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील रुग्णांसाठी मोठी दिलासादायक बातमी असून, मेंदू व मज्जासंस्थेशी संबंधित गंभीर आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधा आता महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे. हॉस्पिटलतर्फे २४ तास आपत्कालीन सेवेसह अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभाग (Neurology ICU) सुरू करण्यात आला असून, शासकीय योजना तसेच कॅशलेस उपचार सुविधेमुळे रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

महादेव हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या या न्यूरोलॉजी विभागात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मल्टीपॅरामीटर मॉनिटरिंग, आयसीपी मॉनिटरिंग, ईईजी, व्हेंटिलेटर केअर यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सुसज्ज करण्यात आलेल्या या विभागात गंभीर न्यूरोलॉजिकल रुग्णांवर तातडीने उपचार करता येणार आहेत.
विशेष म्हणजे, न्यूरो-रिहॅबिलिटेशन अंतर्गत फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी आणि दीर्घकालीन पुनर्वसन नियोजनाची सुविधा देखील रुग्णांना मिळणार आहे. त्यामुळे स्ट्रोक किंवा मेंदूविकारानंतरच्या रुग्णांना संपूर्ण पुनर्वसन प्रक्रिया एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
या विभागात स्ट्रोक (लकवा), इस्केमिक आणि हेमोरॅजिक स्ट्रोक, थ्रोम्बोलायसिस, मेंदूतील रक्तस्त्राव, अॅन्युरिजम, अपस्मार (एपिलेप्सी), मेंदूचे झटके, मणक्याचे आजार, स्पायनल कॉर्ड इन्ज्युरी, तीव्र डोकेदुखी, मायग्रेन, मेंदूज्वर आणि मेंदूतील संसर्ग अशा विविध गंभीर आजारांवर विशेष उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या विभागाचे मुख्य सल्लागार डॉ. कमलेश तायडे हे एमडी मेडिसिन असून त्यांनी एम्स रुग्णालय, नवी दिल्ली येथून न्यूरोलॉजीचे विशेष शिक्षण घेतले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना आधुनिक आणि सुरक्षित उपचार सेवा दिल्या जात आहेत. तसेच डॉ. हितेश मोरे आणि डॉ. आशिक शेख हे योजना समन्वयक म्हणून कार्यरत असून, विविध शासकीय योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी सहाय्य करत आहेत.
हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय विमा योजनांअंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही अत्याधुनिक उपचार सहज मिळू शकणार आहेत.
मेंदू आणि मज्जासंस्थेशी संबंधित प्रत्येक समस्येवर योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने महादेव हॉस्पिटलतर्फे ही सेवा सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. अधिक माहितीसाठी ०२५७-२२३१००७ किंवा ९९२३६२७२२७ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



