जनआक्रोश आंदोलन मोर्चात सहभागी व्हावे : एम. बी. तडवी

 

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी समुदायाच्या विविध मागण्यांसाठी १८ ऑक्टोबर रोजी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत असून यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी केले आहे.

धनगर समाजाला आदिवासी एस. टी. अनुसुचित जमातीच्या आरक्षण न देणे व जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासींचे एसटी अनुसुचित जमातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी दिनांक १८ ऑक्टोबर बुधवार रोजी फैजपुर येथील प्रांत अधिकारी कार्यावर आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचच्या वतीने भव्य आदिवासी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. आपल्या न्याय हक्काच्या संघर्षासाठी या मोर्चात चोपडा ,रावेर , यावल सहा जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी मोठया संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन आदिवासी तडवी भिल्ल एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी केले आहे .

याबाबत आदिवासी तडवी भिल्ल एकता मंच महाराष्ट्रच्या वतीने काढण्यात आलेल्या आवाहन पत्रकात संघटनेने आपल्या प्रमुख मागण्यांमध्ये म्हटले आहे की , धनगर समाजाला एसटी चे आरक्षण देण्यात येवु नये. जळगाव जिल्ह्यातील बोगस आदिवासी एसटी जातीचे दिलेले दाखले रद्द करण्यात यावेत. रावेर , यावल, चोपडा तालुक्यातील कायम रहिवासी करीत असलेल्यासाठी आदिवासींचे ग्रामपंचायत दप्तरी नमुना क्रमांक८ला नांवे दाखल करण्यात यावीत, पेसा कायदा अधिक सक्त करण्यात यावा , फैजपुर येथे एक हजार विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी आदिवासी वस्तीगृह सुरू करण्यात यावे.

याशिवाय तिडया, अंधारमंळी मोहमांडली या अतिदुर्गम क्षेत्रात रस्ते तयार करण्यात यावेत अशा विविध ज्वलंत प्रश्नांना घेवुन आदिवासी तडवी भिल्ल एक्तता मंचच्या वतीने दिनांक १८ ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी ९ वाजेपासुन फैजपुर साखर कारखाना ते फैजपुर प्रांत आधिकारी कार्यालया पर्यंत हा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात आदिवासी बांधवांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्यअध्यक्ष एम. बी. तडवी व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Protected Content