यावल येथील महिलेची साडेचार लाखात फसवणूक

यावल प्रतिनिधी । शहरात राहणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेला दुकानात लागण्याऱ्या इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेय वस्तू खरेदीच्या नावाखाली सुमारे साडेचार लाख रूपयांमध्ये फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शुभांगी जुगल पाटील (वय-२५)  रा. गवत बाजार मेनरोड यावल ह्या गृहिणी महिला आहे. दरम्यान त्यांनी रिमार्ट शॉपी कंपनी चे मालक विलास मोतीराम राठोड (वय-४५) रा. अंबेजोगाई रोड ता. रेणापूर जि. लातूर यांनी “999  ब्रॉण्ड बाजार” या नावाने रिटेल शॉपी इलेक्ट्रिक व होम अपलायन्सेस वस्तू विक्री करण्याकरीता शुभांगी पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार महिलेने राठोड यांच्या सांगण्यावरून वेळोवेळी साडे चार लाख रूपये दिलेल्या बँक अकाऊंटमध्ये जमा केले. तरी देखील राठोड नामक व्यक्तीने कोणत्याची पध्दतीचा मोबदला दिलेला नाही. किंवा पैसे परत केले नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने यावल पोलीसात धाव घेतली. महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विलास राठोड याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अजमल खान पठाण करीत आहे.

Protected Content