पहूरच्या जिल्हा बँक शाखेत आर्थिक साक्षरता मेळावा

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नाबार्ड अंतर्गत अंतर्गत आर्थिक साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या आर्थिक साक्षरता मेळाव्याचे अध्यक्षस्थानी विभागीय अधिकारी प्रताप सखाराम पाटील हे होते. याप्रसंगी माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे ,माजी सरपंचपती रामेश्वर पाटील, माजी पं स. माजी सभापती बाबूराव घोंगडे,आदींनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्षीय भाषणातून प्रताप सखाराम पाटील यांनी सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी माजी उपसरपंच श्याम सावळे ,ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे ,पत्रकार मनोज जोशी, अनिल चौधरी, डॉक्टर प्रशांत पांढरे, शरद पांढरे ,विकास सोसायटीचे सेक्रेटरी विश्वनाथ सावळे ,रमेश शेकोकार, गणेश भडांगे, अनिरुद्ध जोशी सुपडु पाटील यांच्यासह असंख्य नागरिक या आर्थिक साक्षरता मेळाव्यास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत शिंदे यांनी केले. तर आभार पहूर जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा व्यवस्थापक अजय पांढरे यांनी मानले .आर्थिक साक्षरता मेळावा यशस्वी होण्यासाठी शाखा व्यवस्थापक अजय पांढरे, सौ.चारूलता राने ,शिवाजी पाटील, किरण बोरसे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content