अल्पसंख्याक बचत गटांना सक्षम करणार – वंदना चौधरी

जामनेर, प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून पक्षातर्फे समाज कारणावर अधिक भर दिला जात असुन येत्या काळात अल्पसंख्याक समाजातील महिलांच्या बचत गटांना दिल्या जाणाऱ्या दोन लाख रूपये रकमेपर्यंतच्या कर्ज योजनेची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी यांनी केले. 

 

पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त जामनेर तालुक्यातील कासली येथे आयोजित महिला संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कासली ग्रुप ग्रामपंचायत आवारात चौधरी यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर गावातील महिलांशी सवांद साधला सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने बोदवड तालुका राष्ट्रवादीतर्फे आयोजित अंगणवाडी सेवीका सन्मान समारोहात बोलताना चौधरी म्हणाल्या की, कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत आशा स्वयंसेवीकांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले महिलांच्या सक्षमीकरणासाठी पक्षाकडून आगामी काळात अनेक योजना प्रस्तावित आहे तसेच महिलांच्या विविध मागण्यांकरीता जिल्हाध्यक्षा नात्याने मी सतत पाठपुरावा करीन यावेळी वरणगाव महिला राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी रंजना पाटील तर बोदवड तालुकाध्यक्षपदी वंदना पाटील यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, आशा स्वयंसेवीकांच्या मानधनात शासनाने १५०० रूपयांची वाढ घोषित केली असुन प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. यावेळी आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांना कोरोनायोद्धा सन्मान पत्र व किट देण्यात आले. मंचावर जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तहसीलदार प्रथमेश घोलप, बोदवड पोलिस निरिक्षक राहुल गायकवाड, नगराध्यक्षा मुमताज बी, जामनेर राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे,डॉ.उद्धवराव पाटील, डॉ.पि.एन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Protected Content