भाजपातर्फे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा

जळगाव, प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या माध्यम विभागातर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असून राज्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी केले आहे.  

 

जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी म्हणाले की, आपला देश १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी निबंध चार हजार ते पाच हजार शब्दांचे असावेत, त्यामधील नोंदींच्या संदर्भांचा स्पष्ट उल्लेख असावा आणि निबंध संशोधनपर असावेत अशी अपेक्षा आहे.  स्पर्धेसाठीचे निबंध [email protected] या २५ नोव्हेंबरपर्यंत ई मेलने पाठवावेत. विविध क्षेत्राशी संबंधित २५ विषयांची यादी निश्चित केली असून त्यापैकी कोणत्याही एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत निबंध लिहावा. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्रपणे पारितोषिकांची व्यवस्था केली आहे. विषयांची यादी आणि स्पर्धेची नियमावली प्रदेश भाजपाच्या मनोगत या ॲपवर उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. हे ॲप https://bit.ly/3fhfYRp या लिंकवरही उपलब्ध आहे. असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जळगाव महानगर मनोज भांडारकर यांनी कळविले आहे

 

Protected Content