राष्ट्रवादीच्या महिला आमदारासह कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण

नाशिक (वृत्तसंस्था) नाशिकमधील राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, आमदारांसह त्यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

 

टीव्ही ९ ने याबाबत वृत्त दिले आहे. वृत्तात म्हटलेय की, आमदाराच्या कुटुंबातील काहीजण मुंबईला नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. त्यानंतर बहीण आणि मुलगी यांचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील आमदारांचा अहवालही गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कालपर्यंत 1074 वर पोहोचली. मालेगावात सर्वाधिक रुग्ण आहेत. नाशिक शहरात गुरुवारी दिवसभरात 14 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यामुळे शहराची रुग्णसंख्या 152 वर पोहोचली आहे.

Protected Content