समाजसेवक मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून चारा छावणीची उभारणी

chara chawani

चाळीसगाव प्रतिनिधी । प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक मंगेश चव्हाण यांच्या सौजन्याने चारा छावणी सावली शेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मागे रोहिणी तालुका- चाळीसगाव येथे करण्यात आले. या ठिकाणी दुष्काळामुळे गुरांना पिण्यासाठी पाण्याचा सिमेंट हौद तयार करण्यात आंला.

पंचक्रोशीतील ग्रामस्थानी याकामी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आज प्रायोगिक तत्वावर या छावणीला सुरुवात करण्यात आली व गुरांना कुटी मशिनच्या साहयाने ऊसाची कुटी करून प्रत्येक जनावराला चारा वाटप करण्यात आला. सावली, पाणी आणि ऊसाची कुटी अश्या सुविधा समाजसेवक व उद्योगपती मंगेश दादा चव्हाण यांनी उपलब्ध करून दिल्या. मुले पंचक्रोशीतील शेतकरी बंधूनी दादांचे मनःपूर्वक आभार मानले व समाधान व्यक्त केले.

Add Comment

Protected Content