पद्मालय धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ (व्हिडीओ)

padmalay

कासोदा प्रतिनिधी । एरंडोल येथून जवळ असलेल्या पद्मालय येथील धरणामध्ये झालेला गाळ काढण्याचे अभियान अनुलोम संस्था व महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला एरंडोल येथील तहसीलदार अर्चना खेतमाळीस, नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार एम.बी. परदेशी, प्रगतशील शेतकरी पंकज पाटील, रवींद्र महाजन, वस्ती मित्र अतुल मराठे, सागर रायगडे आदी उपस्थित होते.

या अभियानासाठी अनुलोम संस्थेचे विभाग जनसेवक दत्ताजी नाईक व विभाग जनसेवक अमितजी डमाले मार्गदर्शन करीत आहे. या अभियानामुळे शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रमाणात फायदा होतांना दिसत आहे. शेतकरी शेतात हा गाळ टाकतात तर हा गाळ शेतीसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. याच्यामुळे जमिनी सुपीक होते. गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार होतांना दिसत आहे तसेच पुढे काही शेतकरी आपले मनोगत व्यक्त करीत आहे. पिकाला फायदा होती तरी या अभियानाचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा असे आवाहन अनुलोम संस्था व महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content