विदर्भातील बैल पोळ्याची अनोखी परंपरा ! (व्हिडीओ)

1Bailpola

खामगाव, जि. बुलडाणा | संपूर्ण राज्यासह विदर्भातील बुलडाणा येथे पोळा सणाकरिता बळीराजा सज्ज झाला आहे. आज (३० ऑगस्ट) पोळा सर्वत्र साजरा होत आहे.

 

त्याकारिता बळीराजा पुन्हा एकदा दरवर्षाप्रमाणे बैलाला नदीवर नेवून व आंघोळ घालतो. वर्षभर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाच्या खांद्याला लोणी व हळदीची मालीश करतो. या खान्दे- मळणीनंतर बैलाला पोळाचा दिवसभर विश्रांती दिली जाते. या नंतर बळीराजा व त्याच्या परीवारातील सदस्य बैलाला पोळाच्या दिवशी पुरण-पोळी व ज्वारीच्या ठोंबराच्या जेवणाचे आमंत्रण देतात. हेच बैलाला पारंपारिक मानाचे आवतन असते. त्या नंतर बैलाच्या शिंगांना रंगरंगोटी करून तेलाने मालीश केली जाते. बैलाला वर्ष भर झालेल्या लहानमोठ्या दुखापतीवर उपचार करून त्या दुर केल्या जातात. पोळ्यामूळे संपूर्ण गावात एक नवा उत्साह दिसून येतो. बळीराजा करिता हा एक मोठा सण असतो.

संपूर्ण वर्षभर बळीराजासोबत बैल शेतामध्ये राबत असतो. त्यामूळे पोळ्याच्या दिवशी त्याला मानाचे निमंत्रण पारंपारिक पध्दतीने आजही दिले जाते. त्यामूळे या आवतनाला विशेष महत्व आहे. पोळ्याकरिता बळीराजाने आपल्या सर्जा-राजाला हे आवतन देण्याची पद्धत आजही ग्रामीण भागात जोपासलेली आहे. अनेकवेळा बळीराजाला निसर्गाच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. यावर्षी राज्यात हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे काही भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजा काही प्रमाणात चिंताग्रस्त आहे. तरीदेखील हिंमत न हारता पोळ्याच्या निमित्ताने का असेना पुन्हा आपल्या सर्जा-राजाला सोबत घेऊन तो येणाऱ्या सर्व संकटाना तोंड देण्यास सज्ज होतोय. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

 

लेखक – अमोल सराफ, खामगाव (बुलढाणा)

 

Protected Content