Home Cities जळगाव बालगंधर्व स्मृतिदिनानिमित्त ‘नाट्य संगीत रजनी’चे आयोजन

बालगंधर्व स्मृतिदिनानिमित्त ‘नाट्य संगीत रजनी’चे आयोजन

0
35

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तसेच बालगंधर्वांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर शनिवार, दि. ३० जुलै रोजी  ‘नाट्य संगीत रजनी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जळगावकर यांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १५ जुलै या बालगंधर्वांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. ३० जुलै  रोजी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात संध्याकाळी ठीक ७ वाजता “नाट्य संगीत रजनी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सादर करणारे कलावंत मुंबईचे असून  प्राजक्ता काकतकर व ओंकार प्रभुघाटे आहेत. त्यांना तबल्याची साथ धनंजय पुराणिक व ऑर्गनची साथ मकरंद कुंडले करणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री दीप्ती भागवत करणार आहे. हा कार्यक्रम तमाम जळगावकर रसिकांसाठी विनामूल्य असून सुरवातीच्या काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमास स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रम वेळेत सुरू होईल रसिकांनी १० मिनिटे आधी आसनस्थ होण्याची विनंती आयोजकांनी केली आहे

 


Protected Content

Play sound