धरणगाव नगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

धरणगाव, प्रतिनिधी । स्वच्छ भारत अभियान अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण २०२०” मध्ये धरणगाव नगरपरिषदेचा पश्चिम विभागातून (राजस्थान , मध्यप्रदेश , गुजरात , महाराष्ट्र , गोवा) ( २३३ वरुन ८६वा ) क्रमांक तसेच महाराष्ट्र राज्यातून ६३ वा क्रमांक आला.

धरणगाव नगरपरिषदेचा पश्चिम विभागातून”स्वच्छ सर्वेक्षण २०२०” अंतर्गत ८६ व राज्यातून ६३ वा क्रमांक आल्याने धरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी., मुख्याधिकारी जनार्धन पवार .,सर्व नगरसेवक तसेच सर्व अधिकारी व न.पा. कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Protected Content