पाचोरा येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक केंद्र राबविणार ‘महावृक्षारोपण अभियान’

shri swami samarth

पाचोरा (प्रतिनीधी) । अखिल भारतिय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग गुरूकुल पिठ त्र्यंबकेश्वर शाखा पाचोरा श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक व बालसंस्कार सेवा केंद्र कृषी विभाग यांच्यातर्फे पाचोरा तालुका व पंचक्रोषित महावृक्षारोपन अभियानाची सुरूवात २ जुन रोजी पिंप्री सारवे या गावात करण्यात येत आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या उक्तीप्रमाणे वृक्षांचे महत्व आजच्या पिढिला कळायला सुरूवात झाली आहे.

गेल्या पाच वर्षांपासुन अवघ्या महाराष्टात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने दुषकाळी परिस्थीती ओढावली आहे. ही परीस्थीती नेमकी कशामुळे उद्धभवली याच उत्तर जनसामान्यांसह शासनालाही मिळाले असुन दरवर्षी पावसाळ्यात शक्य होईल तितके वृक्षरोपण करण्याचे काम सर्वस्थरातुन केले जाते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने व प.पु.गुरूमाउली यांच्या आर्शिवादाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातुन आजवर आध्यात्मिक कार्य व त्यासोबतच सामाजिक कर्तव्याची जाण ठेउन अनेक समाजउपयोगी उपक्रमांना गती देण्यात आली आहे.

आज आशिया खंडातील एक हजार बेडचे सर्वात मोठे विनाशुल्क मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलची उभारणी त्र्यंबकेश्वर परिसरात सुरू झाली असुन रूग्णांना सेवाही सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह देशातिल महत्वपुर्ण धार्मिक स्थळावरही सर्वसामान्य सेवेकर्‍यांना आध्यात्मिक सेवा करता यावी, यासाठी विनाशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम गुरूपिठामार्फत अविरत सुरू आहे. येणार्‍या पावसाळ्यात संपुर्ण महाराष्ट्राचे रान हिरवळ करून पर्जन्यवाढ होण्यासाठी वृक्षारोपनाची संकल्पना प.पु.गुरूमाउलींच्या आर्शिवादाने साकारण्यात येत आहे. यात पाचोरा तालुका व पंचक्रोषीतील सेवेकर्‍यांनी आपल्या परिसरातिल शेतकर्‍यांच्या शेतात किमान पाच वृक्षांची लागवड करणे व त्याचे संगोपण करणे हा संकल्प हाती घेतला आहे. या सोबतच गाव, वाडे, वस्ती, तांडे येथेही वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

२ जुन रोजी अखिल भारतिय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे उत्तर महाराष्ट संपर्क प्रमुख पी.एन.शिंपी व जळगाव जिल्हा प्रतिनीधी विजय निकम यांच्यासह पाचोरा तालुक्यातिल मान्यवरांच्या उपस्थीतीत तालुक्यातिल “सार्वे पिंप्री” येथिल नवनिर्मित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या नुतन वास्तुत प्रतिमा स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यावेळी पाचोरा तालुक्यातिल वृक्षारोपण अभियानाचा श्रीगणेशा करण्यात येणार आहे. या वृक्षारोपण महाअभियानासाठी कृषी विभागासह, वनविभाग व अनेक सामाजिक संस्थांनी व सेवेकरी यांनी पुढाकार घेउन जोमाने कामाला लागली आहेत.या महाअभियानासाठी लागणार्‍या वृक्षांसाठी पाचोरा तालुका व पंचक्रोषितिल असंख्य सामाजिक संस्थांनी मदतिचा हात पुढे केला आहे. वृक्षलागवड व त्याच्या संवर्धनासाठी तालूक्यातिल हजारो सेवेकरी कामाला लागली आहेत.

तालुक्यातील या गावांचा राहणार सहभाग
या अभियानात सुरवातीला जारगाव, खडकदेवळा, डोंगरगाव, सारोळा, गोंदेगाव, वलठाण , बनोटी, पळाशी, कडेगडगाव, तिडके, मुखेड, गोराडखेडा, बिल्दी, साजगाव, सांगवी, कुर्‍हाड लोहारा, नंदिचे खेडगाव, कुरंगी, माहीजी, दहीगाव, डोकलखेडा, आसनखेडा, परधाडे, तारखेडा, ओझर, गिरड, अंजनविहीरे, भातखेंडे, अंतुर्ली, हडसन, पहाण, निमखेडी, नगरदेवळा, महादेवाचे बांबरूड, लोहटार, पिंपळगाव(हरे.), लोहारी, वरखेडी, मोढाळे, निंभोरी, सातगाव डोंगरी, शिंदाड, सार्वेपिंप्री, कडेवडगाव, वाकडी , घोसला यासारखी गावांचा व तेथील सेवा केंद्राचा समावेश आहे.फक्त वृक्षारोपन न करता त्याचे पुढिल ३ वर्ष सर्वधनाची जबाबदारीही लागवड करणार्‍यांनी घ्यायची असल्याने ही वृक्षलागवड नुसती नावाला न राहता ती खर्‍या अर्थाने पुढिल काळात नैसर्गिक पर्जन्य वाढिस मदत करणारी राहिल.या वृक्षलागवड महाअभियानात आपले योगदान देण्यासाठी पाचोरा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातिल सेवेकर्‍यांशी संपर्क साधन्याचे अवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content