रस्त्यावरील खड्डयात कमळाचे फुल ! : शिवसेनेचे अनोखे आंदोलन (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । शहर महापालिका हद्दीतील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खडयामध्ये जळगाव शहर शिवसनेच्या वतीने कमळाचे फुले लावून अनोखे आंदोलन करून जळगाव शहर सुंदर करण्याचे काम शिवसनेच्यावतीने करुन महापालिकेचा कारभारचा निषेध केला.

.
जळगाव शहर महानगरपालिकने गेल्या काही वर्षापासून जळगांव शहरातील रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे. ठिकठिकाणी झालेल्या खडयाची पाहणी करुन लवकरात लवकर शहरातील रस्त्याची डागडूजी किवा नविन रस्ते तयारकरुन जळगाव शहरवासीयांना चांगले रस्ते तयार करुन जळगावकरांचे हाल थांबवावेत अशी मागणी करण्यात आली. र्मागणी मान्य न झाल्यास जळगाव शहर शिवसनेच्या वतीने येणाऱ्या काळात महापालिका आयुक्तांना खडी, डांबर व कछ देवून त्यांचा सत्कार करण्यात येईल असा इशारा निलेश पाटील यांनी दिला. याप्रसंगी गजानन मालपुरे, संजय कोल्हे, युवा सेनेचे जितेंद्र बारी, सोहम विसपुते, नितीन राजपूत, विजय राठोड, लोकेश पाटील, मंगला बारी, ईश्वर नाईक, महेंद्र सोनवणे, विलास भदाणे, ज्ञानेश्वर सोनवणे, पृथ्वीराज सोनवणे, विमल मेहता, भारत कोचुरे आदी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/304895997513134/

Protected Content