Home राजकीय केंद्र सरकार मुकं, दृष्टिहीन तर होतेच, आता बहिरेही झालेय : राहुल गांधी

केंद्र सरकार मुकं, दृष्टिहीन तर होतेच, आता बहिरेही झालेय : राहुल गांधी

0
143


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकार आधी मुकं तर होतेच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरेही झाले आहे, अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

आशा सेविकांच्या संपावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील प्रत्येक घरापर्यंत आशा सेविका आरोग्य सुरक्षा पोहोचवतात. खऱ्या अर्थाने त्या आरोग्य योद्धा आहेत, पण आज स्वतःच्या हक्कासाठी संप करण्यासाठी मजबूर झाल्या आहेत. सरकार मुकं तर होतेच, कदाचित आता दृष्टिहीन आणि बहिरेही झाले आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ट्वीटरवरून टीका केली आहे.


Protected Content

Play sound