खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण !

नांदेड (वृत्तसंस्था) येथील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुलापाठोपाठ चिखलीकरांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली. दोघं पिता-पुत्रावर औरंगाबादमध्ये उपचार सुरु आहेत.

 

प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपली प्रकृती ठणठणीत असून, कोणीही चिंता करु नये, असे खासदार चिखलीकर यांनी म्हटले आहे. नांदेड जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांचे वडील आणि प्रताप पाटील चिखलीकर यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही मतदारांच्या संपर्कात आले होते. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

Protected Content