कोरोना : फैजपूर येथे हनुमान जन्मोत्सव साधेपणाने साजरा

फैजपूर प्रतिनिधी । हनुमान जयंती उत्सव गावातील सर्वत्र चालत आलेली जुनी परंपरा आहे. दरवर्षी येथील पुरातन मोठा हनुमान मंदिरात पुरोहित एकत्र येऊन विधिवत पूजा सोहळा होमहवन, अभिषेक पूजा पाठ व आरती करण्याची करण्यात येते. यावेळी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हा हनुमान जन्मोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी देशासह संपूर्ण जगावरील कोरोनविषाणू संसर्गजन्य महामरीच्या लढयात लवकरात लवकर यश मिळवून नागरिकांचे आरोग्य दिर्घयुषी होण्याची साकडे पुरोहितांद्वारे घालण्यात आला साजरा केला. शहरातील त्रिवेणी वाडा येथिल हनुमान जन्मोत्सव निमित्त सकाळी ८ समिती अध्यक्ष वैभव वकारे यांच्या हस्ते आभिषेक करून आरती करण्यात आली तसेच समिती तर्फे गरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले. तुषार किरंगे, मयुर बोरसे, उमेश वायकोळे, राकेश मिस्त्री, अक्षय परदेशी, दीपक कपले, योगेश सूर्यवंशी, आतिश परदेशी, रूपेश मिस्त्री, यश वर्मा यांनी परिश्रम घेतले.

Protected Content