जुनी पेन्शनबाबत शासनाने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातुन सन २०१५ जुनी पेन्शन मिळावी अशी मागणी वेळोवेळी करण्यात आलेली आहे. परंतू आश्वासन देवूनही प्रश्न मागणी लागला नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी अशी मागणी राज्य संघटन संजय सोनार यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातुन सन २०१५ जुनी पेन्शन मिळावी म्हणुन आजपर्यंत विविध असे भव्य-दिव्य आंदोलन केलेले आहेत. गेल्या 27 डिसेंबर रोजी नागपुर येथे पेन्शन संकल्प यात्रा काढून जुनी पेन्शन मागणीसाठी भव्य-दिव्य आंदोलन केले होते. नागपुर येथे संपुर्ण महाराष्ट्रातील दीड लाख कर्मचारी रस्त्यावर उतरुन जुनी पेन्शनची मागणी केली होती. महाराष्ट्राच्या इतिहासातील कर्मचाऱ्यांनी काढलेला सर्वांत मोठा मोर्चा म्हणुन इतिहासात त्याची दखल घेतली गेली आहे. सदर मोर्चाप्रसंगी शासनाने संघटनेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावुन मंत्रिमंडळाच्या पहिल्या मिटींगमध्ये आजवर मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जुनी पेन्शन व ग्रँज्युएटी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कुटुंबनिवृती व ग्रँज्युएटी देऊ असे ट्विट केले होते.

शासनाने दिलेल्या आश्वासनावर संघटनेने विश्वास ठेऊन आंदोलन मागे घेतले होते. काल मुंबई मंत्रिमंडळाची मिटींग पार पडली.त्या मिटींगमध्ये सदर आश्वासनाबाबत कुठलीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. याबाबतीत अधिक माहिती देतांना राज्यसंघटक संजय सोनार कळवाडीकर यांनी सांगितले की, दीड लाख कर्मचारी नागपुर येथे येऊन जुनी पेन्शन मिळावी म्हणुन आक्रोश करुनही जर शासन आपले आश्वासन पाळत नसेल तर भविष्यात सर्व संघटना मिळुन कामबंद आंदोलन करणार आहेत. २६ जानेवारी रोजी जानेवारीपर्यंत शासनाने दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करावी.अन्यथा भविष्यकाळात पाच लाख शासकीय कर्मचारी रस्त्यावर उतरुन आपला आक्रोश शासनाला दाखवुन देतील.तरी मायबाप शासनाने आम्हांला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करुन मृत कर्मचाऱ्यांचा कुटुंबांला न्याय द्यावा.असे आवाहन सोनार यांनी केले आहे.

Protected Content