ए.टी. झांबरे विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, केसीई सोसायटीच्या ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी १२ जानेवारी रेाजी सकाळी ११ वाजता शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे आणि पर्यवेक्षक नरेंद्र पालवे यांच्याहस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी किंजल महाजन, रेवती पांढारकर, विवेक थोरात, जागृती हटकर, हितेश पाटील, कुशल वाघ, अनिकेत गाजरे, गायत्री शिंदे ,प्रमोद पाटील या विद्यार्थ्यांनी मुघलशाही व निजामशाही यांनी गुलामगिरीतून भारतीयांचा जो छळ केला. तो संपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणापासून रामायण, महाभारत अभिमन्यु या कथा सांगत श्रवण संस्कार दिले. संताची शिकवण, युद्ध निती, धर्म रक्षण शिकविले राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील शिकागो धर्म परिषदेचे विविध प्रसंगाचे कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.बी. कोळी यांनी तर आभारप्रदर्शन पराग राणे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी उपस्थित होते.

Protected Content