केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे ‘ऑनलाईन राष्ट्रीय पोस्टर स्पर्धा’

जळगाव प्रतिनिधी । येथील केसीई अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने नुकतीच राष्ट्रीयस्तरावरची ऑनलाईन पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.

या ऑनलाईन पोस्टर स्पर्धेत, आत्मनिर्भर भारत, ग्रीन एनरजि, डिजिटल इंडिया, वर्ल्ड वॉर : कोरोना व्हायरस आणि ऑनलाईन शिक्षण असे एकूण ५ विषय देण्यात आले.

ऑनलाईन पोस्टर स्पर्धेचा निकाल आयोजन समितीतर्फे जाहीर करण्यात आला. त्यात अनुक्रमे प्रथम क्रमांक सागर रामदास काकडे (के सी ई अभियांत्रिकी) , व्दितीय क्रमांक कल्याणी संजय पाटील (जि एच रायसोनी पॉलीटेक्नीक जळगाव) तृतीय क्रमांक मिताली किरण टोके (शासकीय तंत्रनिकेतन जळगाव) उत्तेजनार्थ पारितोषिक मंगेश एकनाथ काशिदे (वसंतराव नाईक महाविद्यालय नांदेड) आणि निखिल रवींद्र ठाकरे (केसीई अभियांत्रिकी) या सर्व विजेत्यांना रोख रक्कम ऑनलाईन च्या माध्यमातून त्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली.

या ऑनलाईन पोस्टर स्पर्धेत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला यात अनुक्रमे शासकीय तंत्रनिकेतन जळगाव, वसंतराव नाईक महाविद्यालय नांदेड रायसोनी इंजिनीरिंग आणि पॉलीटेक्नीक जळगाव, मू जे महाविद्यालय जळगाव, आय.एम.आर, गंगामाई इंजिनीअरिंग कॉलेज, धुळे, मातोश्री प्रतिष्ठान समूह नांदेड, जे.टी.महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर, गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, केसीई अभियांत्रिकी जळगाव आणि इतर महाविद्यालयाचा प्रामुख्याने समावेश होता. या राष्ट्रीय स्तरावरच्या पोस्टर स्पर्धेचे आयोजन कार्यक्रम समन्वयक प्रा लीना वाघुळदे, कॉर्पोरेट प्रमुख तथा वरिष्ठ प्रा राजेश वाघुळदे आणि प्रा.डॉ. प्रज्ञा विखार यांनी केले.

Protected Content