गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी (व्हिडीओ)

midc

जळगाव प्रतिनिधी । विक्री करण्यासाठी आणलेल्या एक लाख रूपये किंमतीचा दहा किलो गांजासह दोघा संशयितांना एमआयडीसी पोलीसाच्या ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीसांना शिरसोली येथे 29 मे रोजी एक व्यक्ती दुचाकीने गांजा घेवून येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोहेकॉ जितेंद्र मराठे यांनी चाचपणीसाठी दुपारी 1 वाजता शिरसोली बसस्थानकाजवळ असतांना आकाश राजकुमार बालाणी रा. गायत्री नगर जळगाव हा ज्यूपीटर दुचाकी क्रमांक एमएच 19 डीएफ 4152 वर आला. त्याच्याजवळ असलेल्या बँगेची विचारपूस केली असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. राठोड यांनी बॅग तपासली असता त्याला एक लाख रूपये किंमतीचे 10 किलो गांजा आढळून आला. दरम्यान हा माल त्याने जळगावातील भारत टिकमदास पोपटाणी यांच्याकडून आणल्याची माहिती दिली. एमआयडीसी पोलीसांनी गांजाने भरलेल्या बॅगेसह संशयित आरोपी आकाश याला ताब्यात घेतले. त्यानंतर भारत टिकमदास पोपटाणी याला देखील सायंकाळपर्यंत एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. पोहेकॉ जितेंद्र राठोड यांच्या फिर्यादीवरून आकाश बालाणी यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत तपास पीएसआय राजकुमार ससाने करीत आहे.

Add Comment

Protected Content