मेडिकल चालकाची ४८ हजाराची फसवणूक ; कंपनीविरोधात गुन्हा

यावल प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जे.टी. महाजन व्यापारी संकुलनातील मेडीकल स्टोअर्स चालकाची एका कंपनीकडुन विविध औषधी पाठविण्याच्या नावाखाली ४८ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक झाल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की , सुनिल मोतीराम भांरबे यांनी ऑक्सीमीटर व मास्क मागावीण्यासाठी मानसा एन्टरप्रायजेस बंगलोर कंपनीकडे ऑनलाईन ४८ हजार सातशे सोळा रुपये भरणा केला मात्र कंपनिने कोणतेही साहीत्य न पाठविता मेडीकल व्यवसायीक सुनिल भारंबे यांची आर्थीक फसवणूक केल्यावरून अखेर  सुनिल भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून येथील पोलीस स्टेशनमध्ये आर्थीक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेडीकल स्टोअर्सचे संचालक सुनिल भारंबे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आमचे मालकीचे यावल येथे मेडीकल दुकानासाठी मानसा एन्टरप्रायजेस बंगलोर या कंपनीकडे इंडीया मार्ट या फोन अॅपव्दारे ऑनलाईन अॅपवरून ४६ हजार ६५० रुपये किमतीचे ८५ ऑसीमीटर बीपीएल कंपनीचे आॅक्सीमीटर व १०० एन९५ मास्क साठी १९६६ रुपये १२ जुन रोजी ऑनलाईन पैशांचा भारणा केला मात्र अद्याप पावेतो कंपनीने साहीत्य पाठवले नसुन आपली आर्थीक फसवणूक केली म्हणून कंपनी विरूघ्द येथील पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम ४२०प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Protected Content