वृक्षारोपणाने साजरा केला जिल्हा परिषद अध्यक्षांचा वाढदिवस !

ujjwala patil birthday

कासोदा ता. एरंडोल राहुल मराठे । येथील ग्रीन आर्मीतर्फे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना.सौ उज्वला मच्छिंद्र पाटील यांचा जन्म दिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

येथील कासोदा ग्रीन आर्मी ग्रुप तर्फे पर्यावरण संरक्षणासाठी आपल्या ग्रुप मधील सदस्याचे जन्म दिवस अथवा लग्नाचा वाढदिवस केक कापून साजरा न करता वृक्षारोपण करून साजरा करतो. भाजप ता.युवा अध्यक्ष नरेश ठाकरे यांच्या वाढदिवसापासून ही पध्दत सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ३० रोजी त्यांच्या बंगल्याच्या समोर दोन झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यासोबत वनकोठे बांभोरीचे लोक नियुक्त सरपंच उमेश पाटील यांच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या घरासमोर सपत्नीक वृक्षारोपण करण्यात आले. तर सामाजिक कार्यकर्ते सनी नवाल यांच्या जन्मदिवसा निमित्त त्यांच्या हस्ते देखील त्यांच्या घरा समोर वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी जेष्ठ नागरिक सराफ व्यापारी केशव शेठ भामरे, लोकमतचे जेष्ठ पत्रकार प्रमोद पाटील, पत्रकार केदारनाथ सोमाणी, पत्रकार वासुदेव वारे, पत्रकार राहुल मराठे, नरेश ठाकरे, निरंजन पाटील, पत्रकार राहुल शिंपी, सागर पाटील, पत्रकार प्रशांत सोनार, सागर वाणी, गणेश कुंभार, संजय जमादार, ऊमेश नवाल, शैलेश पांडे आदी उपस्थित होते.

ग्रीन आर्मीच्या उपक्रमाला प्रतिसाद

कासोदा येथे कासोदा ग्रीन आर्मी गृप तर्फे एक झाडाचे रोपटे सप्रेम भेट देऊन ते रोपटे त्याच्या घरी त्याच्या हस्ते लगेच आपल्या घराजवळ जाऊन लावायचे , आणि त्या रोपट्याच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्यावरच टाकायची असा उपक्रम राबविण्यात येत असून याला प्रतिसाद लाभत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा ग्रुप समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश रूजवत असून कासोदेकरांना हे भावत असल्याचे दिसून आले आहे.

Add Comment

Protected Content