एरंडोलात पुन्हा कोरोनाचा हाहाकार; कठोर उपायांची गरज

एरंडोल रतीलाल पाटील । गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला असून आज दिवसभरात तब्बल ९८ नवीन बाधीत आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता कठोर उपाययोजनांची गरज असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.

एरंडोल तालुक्यात आधी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. प्रशासकीय प्रयत्नांनी यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. मात्र अलीकडच्या काळात पुन्हा एकदा रूग्ण संख्या वाढू लागल्याचे दिसून येत आहे. यातच गत २४ तासांमध्ये तालुक्यात तब्बल ९८ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत.

आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील रूग्णांचा समावेश आहे. कोरोनाची साखळी खंडीत व्हावी म्हणून आता प्रशासनाने कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करावी असे अपेक्षित आहे. तर जनतेचे संक्रमणाचा धोका लक्षात घेऊन कोरोनाचे सर्व नियम पालन करावे हे देखील तितकेच आवश्यक आहे.

Protected Content