जुगारासाठी पैसे न दिल्याने विवाहितेचा छळ; यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल  – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जुगारासाठी पैसे न दिल्याने तालुक्यातील किनगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पती व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील किगनाव येथील माहेर असलेल्या हिना शेख मोहसीन (वय-२३) याचा विवाह जळगाव येथील मोहसीन अख्तर सलीम अख्तर याच्याशी रितीरीवानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेचा छळ करण्यास सुरूवात झाली. पती मोहसील अख्तर सलीम याने जुगार खेळण्यासाठी विवाहितेने माहेरहुन पैसे आणावे यासाठी मागणी केली. पैसे आणाले नाही म्हणून नणंदेने देखील मानसिक त्रास दिला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. शुक्रवार १५ जुलै रोजी सायंकाळी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती  मोहसीन अख्तर सलीम अख्तर, नणंद राहत अख्त सलीम अख्तर दोन्ही रा. शनीपेठ, जळगाव यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content