शिवजयंती सह महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार, घेऊन महाराष्ट्र शेतकरी संघटनेची १९फेब्रुवारी २०२२ रोजी स्थापना करण्यात आली होती म्हणून दुसरा वर्धापन दिवस व शिवजयंती महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, पत्रकार भुपेंद्र मराठे, पत्रकार अशोक ललवाणी, पत्रकार योगेश पाटील,पत्रकार दिलीप सोनार, पत्रकार विशाल महाजन, पत्रकार प्रकाश पाटील, पत्रकार राकेश शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, सुनील देवरे यांनी दोन वर्षापुर्वी लावलेले रोपटे आता विशाल वटवृक्षात रूपांतर करत आहे. तर पत्रकार भुपेंद्र मराठे यांनी संघटना बळकट करण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श घेत शेती उपयोगी कार्य करावे. पत्रकार विशाल महाजन यांनी सांगितले की संघटना चांगले काम करत आहे म्हणून आम्ही सर्व आपल्या पाठिशीआहोत. अध्यक्षीय भाषणात संघटनेचे संस्थापक तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी सांगितले की संघटना छत्रपतींच्या विचारांवर चालते व आमची पुर्ण टिम हि शेतकरी हितासाठी काम करते त्यामुळे आम्ही दररोज एक प्रकारे शिवजयंती साजरी करतो. म्हणून आज शिवजयंती व संघटनेच्या वर्धापन दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला जावा म्हणून शासनाच्या अटल भुजल योजनेच्या माध्यमातून १४ ते १८ लाख सबसिडी शेतकऱ्यांना मिळावी म्हणून आज आम्ही शेतकऱ्यांची नोंदणी करीत आहोत. सोबतच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी संघटने मार्फत महिंलांना घरी बसून उद्योग मिळाला पाहिजे म्हणून येणाऱ्या पंधरा दिवसांच्या आत महिला आघाडी च्या महिंलांना गारमेंट मेकिंग उद्योग उभारणी करणार असल्याची घोषणा केली.कार्यक्रमात सारवे,शिरसोदे, वराड या गावात नवीन शाखा स्थापना, एरंडोल तालुका कार्यकारणीची, सल्लागार व समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली.

यावेळी संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा कल्याणी देवरे,पारोळा युवती अध्यक्ष कुसुम बाविस्कर,पारोळा अध्यक्ष डॉ विनोद चौधरी, भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर, मार्गदर्शक सुभाष पवार, धरणगाव तालुका अध्यक्ष संजय चव्हाण,एरंडोल तालुका अध्यक्ष पी जी पाटील,सल्लागार सुर्यकांत पाटील,यांच्या सह शाखा प्रमुख,महिला शाखाध्यक्ष,युवती शाखा अध्यक्ष व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते,अठरा लाख सबसिडी साठी २३८ शेतकऱ्यांनी नावे नोंदणी केलीत.

Protected Content