एकदिवस महाराजांसाठी यासंस्थेच्या वतीने विविध उपक्रमांनी उत्साहात शिवजयंती साजरी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावल या सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने राजे निबांळकर यांच्या किल्ल्यावर आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात शिवकालीन व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
यावेळी शिवज्योत यात्रा तारकेश्वर महादेवाच्या मंदिरातून आरती झाल्यानंतर शिवज्योत पेटवून संपूर्ण गावातून शिवज्योत यात्रा काढण्यात आली व शिवज्यात ची सांगता आई रेणुका माता मंदिरात झाली. यावल तालुक्यातील आठ ते नऊ गावातील शिवभक्तांनी राजे निंबाळकर किल्ल्यावर येऊन ही शिवज्योत पेटवून आपल्या गावी पायी चालून नेली.

भव्य आरोग्य शिबिर- छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित किल्ल्यावर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या करून व एसिजी करून रुग्णांना मार्गदर्शन केले गेले. याप्रसंगी सुमारे४० रूग्णांची तपासणी करण्यात आली,सदर आरोग्य शिबिरासाठी गोदावरी फाउंडेशन संचलित “डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय , जळगाव “यांच्या कडून सहकार्य मिळाले. यावलच्या एतिहासीक अशा राजे निंबाळकरांच्या किल्ल्यावर शिवपूजन व शिवआरती करून कार्यक्रमास सुरुवात झाली नंतर किल्ल्यावर लहान मुलांसाठी शिवकालीन वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली होती या स्पर्धेमध्ये लहान मुलांनी शिवकालीन वेशभूषा सादर करून सर्वांची मन आकर्षित केले नंतर शिवकालीन चित्र सादरीकरण स्पर्धेमध्ये मुलांनी सहभाग घेऊन किल्ल्याबद्दल माहिती दिली.

या कार्यक्रमांमध्ये विशेष आकर्षण राहिले ते शिवकालीन आखाडा स्पर्धेचे या शिवकालीन आखाडा स्पर्धेत तालुक्यातील व गावातील लहान मुलं, मुली, महिला व प्रौढ शिवभक्तांनी सहभाग घेऊन विविध प्रकारच्या पारंपारिक व शिवकालीन शस्त्रकलेचे सादरीकरण केली. या शिवकालीन आखाडा स्पर्धेसाठी गावातील नामांकित वस्ताद रूपचंद घारू यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिली व स्पर्धेतील शिवभक्तांना मार्गदर्शन केले. आखाडा स्पर्धेमध्ये यावल येथील छत्रपती शिवाजी आखाडा व महाकाल आखाडा आणि अट्रावल येथील व्हीएसपी क्लासेस आखाडा यांच्या विविध अशा एकूण ४० शिवभक्तांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले.

सर्व स्पर्धेतील शिवभक्तांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन” एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावल “तर्फे गौरवण्यात आले. कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, भाजपाचे यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, वस्ताद रूपचंद घारु, वस्ताद पंकज पाटील, डॉ.अमोल रावते, मनसेचे चेतन आढळकर, डॉ ललित कुमार, डॉ. साक्षी सातपुते, डॉ. नरेंद्र लव्हाडे, नंदू जाधव, किरण कोळी, कांतीलाल कोळी, भाजपा उपशहराध्यक्ष राहुल बारी, वक्ते विजय कोळीआदी मान्यवर उपस्थित होते..
कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉअभय रावते यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश वारूळकर,दीपक वारूळकर, सोहम बारी, गोपी बारी, प्राची पाठक, भाग्यश्री पाठक, पौर्णिमा ननवरे, गोलू बारी, धनंजय बारी, लोकेश लाड, तेजस धांडे, वैभव बारी, शुभम कोळी, अक्षय पवार अन्य पदाधिकारी व सदस्य त्यांनी घेतली.

Protected Content