अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रांची येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय स्कूल ट्रैक सायकलिंग स्पर्धेत अमळनेरची कन्या स्नेहल शत्रुघ्न माळी हिने १८ वर्षे वयोगटात वैयक्तिक व सांघिक सायकलिंग स्पर्धेत भारतात पहिली येत दोन सुवर्ण पदके प्राप्त केली.
तिच्या या यशाबद्दल मा. आ. शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या परिवारासमवेत काल तिच्या खारघर येथील राहत्या घरी जाऊन स्नेहल चा सत्कार केला व कौतुक केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.