अ‍ॅग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

agroworld

जळगाव प्रतिनिधी । खान्देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ख्याती मिळवलेल्या अ‍ॅग्रोवर्ल्डचे या वर्षीचे प्रदर्शन जळगावात १५ ते १८ नोव्हेंबरच्या दरम्यान आयोजित करण्यात आले असून याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.

शहरातील शिवतीर्थ (जी.एस.) मैदानावर अ‍ॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन १५ ते १८ नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे. यात चार एकरच्या क्षेत्राफळावर तब्बल २१० स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहेत. यात शेती, माती, पाणी, शेततळे, पॉलीहाऊस, पाणी व्यवस्थापन, उच्च तंत्रज्ञान, नवीन वाण, माफक दरात टिकाऊ मिल्कींग मशिन, हायड्रोपोनिक फोडर, ऍझोला, मुरघास, शेतीउपयोगी लहान मोठी औजारे, यंत्र, ट्रॅक्टर आदींना प्रदर्शीत करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात कृषी यंत्र आणि उपकरणांसाठी स्वतंत्र स्टॉल राहणार आहे. सर्व शासकीय विभाग, याच्या विविध योजना आणि अनुदानांबाबतची माहिती बँक रिपोर्टसह एकाच छताखाली येथे उपलब्ध करण्यात येणार आहे. रेशीम तथा मशरूमच्या फायदेशीर शेतीची माहिती येथे दिली जाईल. मोत्यांच्या शेतीचे यशस्वी मॉडेल येथे प्रदर्शीत केले जाणार आहे. ठिबक कंपन्या, बियाणे, खते, किटकनाशके तसेच निविष्ठांचे स्टॉलदेखील यात असतील. शेततळ्याच्या माहितीसह मत्यपालनाशी संबंधीत सर्व माहिती येथे उपलब्ध असेल. तसेच येथे कृषी क्षेत्राशी संंबंधीत पुस्तकेही प्रदर्शीत केली जाणार आहे.

अवाढव्य बैलाचे आकर्षण

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या या प्रदर्शनात भारतातील सर्वात मोठा बैल प्रदर्शीत केला जाणार आहे. लांबी नऊ फुट आणि उंची सहा फुट असणार्‍या या बैलाचे वजन तब्बल एक टन इतके असून हा बैल सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे.

स्टॉल बुकींग सुरू

अ‍ॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन हे विख्यात असून चार दिवसात लाखो लोक याला भेट देतात. येथे मोजके व्यावसायिक स्टॉल्स उपलब्ध असून याच्या बुकींगसाठी ९१३००९१६२१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content