फैजपूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात

Free eye inspection camp at Faizpur excited

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील दत्तमंदिर देवीवाडाजवळ श्री स्वरूपानंद महाराज सेवा प्रतिष्ठान जळगाव यांच्या वतीने आज मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

श्री क्षेत्र दत्त मंदिर डोंगरदे येथील श्री स्वरूपानंद महाराज यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन व चष्मे वाटप करण्यात आले. नेत्रतपासणी शिबिरासाठी मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व चिकित्सालय जळगाव यांनी व त्यांच्या सोबत असलेल्या सर्व डॉक्टरांनी शिबिरासाठी आपली सेवा दिली. यावेळी शिबीरात सुमारे 260 रुग्णांनी आपल्या नावाची नोंदणी करून नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घेतला आहे. प्रथम 50 रुग्णांना नोंदणी करणाऱ्यांना मोफत चष्मे यावेळी वाटप करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी श्री स्वरूपानंद महाराज सेवा प्रतिष्ठान जळगाव यांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content