Home क्राईम अल्पवयीन मुलीचे अपहरण : गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीचे अपहरण : गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने लग्नाचे किंवा इतर अमिष दाखवून अथवा फूस लावून अज्ञात ठिकाणी पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती मिळताच तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कुटुंबीयांच्या तक्रारीवरून जळगाव तालुका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करत आहेत.


Protected Content

Play sound