नायगाव जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियाना २०२१-२२ अंतर्गत कुठला करतो मोफत गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्फराज जुम्मा तडवी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्यध्यापक इतबार रमजान तडवी यांनी केले.

या कार्यक्रमासाठी सुवर्णा पवार, तायरा तडवी, आरती सावळे, शकील तडवी, अजित इतबार तडवी हे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना नवीन गणवेश मिळाले म्हणून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले व त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकवर्ग देखील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे मुख्याध्यापक इतबार तडवी यांनी केले.

Protected Content