यावल तालुक्यात होणाऱ्या विकासकामांची चौकशी करण्याबाबत निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यात जिल्हा परिषदच्या सिंचन विभाग व इतर होणारे निकृष्ठ प्रतिची विकासकामे ही स्वार्थी मंडळी, भ्रष्ठ अभियंता व ठेकेदारांच्या संगनमताने होत आहे. या कामाची तात्काळ चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांच्या तर्फे देण्यात आले.

या संदर्भात पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांनी यावल तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातुन कशा प्रकारे काही स्वार्थी मंडळी व प्रशासकीय यंत्रणा आणी ठेकेदार संगनमताने शासनाच्या लाखो रुपयांच्या विकास निधीची वाट लावत आहे हे दिसुन येत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. याबाबत कशा प्रकारे शासकीय कामे केली जात आहे आणी कामाची गुणवत्ता व प्रत किती निकृष्ठ दर्जाची आहे या बाबत चा हा व्हिडीओ ही त्यांनी दाखवला आहे.

यावेळी शेखर पाटील यांनी म्हटले आहे की , आपण सातत्याने मागील ३ वर्षा पासून मी पंचायत समिती यावल मासिक सभेत अशा प्रकारच्या होत असलेल्या कामांबाबत विषय मांडत आहे व कार्यवाहीची मागणी करीत आहे परंतु दुदैवाने प्रशासकीय यंत्रणेच्या वेळकाढु भोंगळ कारभारामुळे आज पर्यंत एक ही बंधाऱ्यांची चौकशी झालेली नाही व कोणत्याच अधिकाऱ्यांकडून सन्माननिय सदस्यांच्या लिखित तक्रारीची साधी दखल घेतलेली नाही आपण अधिकाऱ्यांना फोन वर बऱ्याच वेळा सांगितलं व्हिडीओ पाठविले परंतु संबधीत अधिकारी यांनी तक्रारी कडे दुर्लक्ष करून ठेकेदारांची बिलं अदा केलेले चित्र पहावयास मिळाले आहे किंवा मिळत आहे .

आपण आज ही जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांना त्यांच्या व्हाट्सउप वर सदर बाबत तक्रार केलेली आहे. या तक्रारीच्या माध्यमातून अधिकारी यांना आवाहन करतो की आपण या बंधाऱ्यांना प्रत्यक्षात खोदुन तपासणी केली तर त्या मध्ये काय मटेरियल निघते ते बघा आणि जर शासकीय निविदेतील इस्टीमत नुसार ही आढळलं तर त्याच्या दुरुस्तीचा संपुर्ण खर्च आपण स्वताच्या पदरुन करू असे आवाहन केले असुन , तालुक्यातील होणाऱ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातुन होणाऱ्या शासकीय कामा काही स्वार्थी मंडळी , पंचायत समितीचे अभियंता व ठेकेदार या सर्वांची मिलीं भगत सुरू आहे मग आपण सर्व उघड्या डोळ्यांनी बघायचं का शासन एव्हढा खर्च करते परंतु काही नालायक ठेकेदार व अधिकारी यांच्या खिशात घालतात किमान आत्ता तरी लाज असेल तर चौकशी करावी ही अशी मागणी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील यांनी केली आहे .

Protected Content