पंतप्रधान मोदींनी मध्यरात्री थेट गाठलं स्टेशन !  

वाराणसी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजेच सातव्या टप्प्याच्या आधी, शुक्रवारी मध्यरात्री अचानक वाराणसी कॅंट रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांनी स्टेशनची पाहणी केली.

मोदींनी येथे रोड शो केला. स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर चालत त्यांनी प्रवाशांच्या सुविधा आणि स्वच्छतेचा आढावा घेतला. यादरम्यान त्यांनी प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या महिलेच्या पायाला स्पर्श केला. येथून पंतप्रधानांचा ताफा खिडकीया घाटावर पोहोचला. पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये रोड शो दरम्यान जमलेल्या मोठ्या प्रमाणात गर्दीतून थोडा ब्रेक घेतला आणि चहाचा आस्वाद घेतला. तसेच चहाच्या दुकानात उपस्थित लोकांशी संवाद साधला.

चहापानाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक नेते पीएम मोदींसोबत दिसले. ज्या दुकानात पीएम मोदींनी सर्वसामान्यांसोबत बसून चहा प्यायले, ते दुकान काशीच्या अस्सी घाट भागातील प्रसिद्ध दुकान आहे. हे दुकान ‘पप्पू की अद्दी’ या नावानं ओळखलं जातं.

मोदींच्या रोड शो दरम्यान पंतप्रधानांनी यावेळी जगप्रसिद्ध बनारसी पानाचा आस्वादही घेतला. यावेळी त्यांनी दुकानदाराची विचारपूसही केली. मोदींनी लंकेच्या प्रसिद्ध दुकानात बनारसी पान खाल्लं. यावेळी कत्था ऐवजी त्यांनी चुना असलेलं पान खाल्लं. नरेंद्र मोदी पान खातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Protected Content