भाजपा भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुखपदी पृथ्वीराज गढरी

पाचोरा प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांनी भटके विमुक्त आघाडी प्रसिद्धी, सोशल मीडिया व धनगर समाज प्रमुखांची घोषणा करण्यात आली. यामध्ये उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुखपदी पाचोरा तालुक्यातील पृथ्वीराज गढरी यांची निवड भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष माजी आ. नरेंद्र पवार यांनी केली.

नवनियुक्त पृथ्वीराज गढरी यांचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गिरिश महाजन, खा.डॉ. विकास महात्मे, खा.उन्मेश पाटील, आ.गोपीचंद पडळकर, आ.मंगेश चव्हाण, धनगर समाज नेते अशोक चोरमले, पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, भटके विमुक्त आघाडी पाचोरा तालुका प्रमुख संजय परदेशी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भा.ज.पा. भटके विमुक्त आघाडी प्रदेश अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार, सहसंयोजक अशोक चोरमले, महिला अध्यक्ष डॉ. उज्ज्वला हाके, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, भाजपा धनगर समाज प्रमुख मिलिंद जाडकर, उत्तरं महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, कार्यलय मंत्री राज खैरनार यांनी पृथ्वीराज गढरी यांची कामाची व समजा बद्दल असलेली आपुलकी पाहून निवड करण्यात आली. मागील सात वर्षापासुन धनगर आरक्षण चळवळीत धनगर समाजाचे चांगले प्रतिनीधित्व पृथ्वीराज गढरी करत आहेत. त्यांच्या धनगर समाजा विषयी कार्य पाहुन भाजपा भटके विमुक्त आघाडी उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख पदी निवड केली. पृथ्वीराज गढरी यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर सर्व स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!