तळेगाव येथे संविधान दिनानिमित्त “वॉक फॉर संविधान” चे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग जळगाव, संविधान फाऊंडेशन, माध्यामिक विद्यालय, तळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व तळेगाव युवा मंच, महिला बचत गट यांच्या सहकार्याने तळेगाव येथे संविधान दिन २६ नोव्हेंबर ते महापरिनिर्वाण दिवस ६ डिसेंबर “समता पर्व” च्या अनुषंगाने संविधान दिनानिमित्ताने “वाॕक फाॕर संविधान” चे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला तालुका विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा दिवानी स्तर न्यायाधीश एन. के. वाळके यांनी माल्यार्पण करुन केली. तद्नंतर संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.

याप्रसंगी मंचावर समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक तथा संविधान फाऊंडेशनचे अनिल पगारे, प्राचार्य एन. जी. शेलार, अॕड. निलेश निकम, पर्यवेक्षक जाधव यांच्यासह महिला ग्राम संघाच्या कुसुम कासार, मनिषा शिंदे, साधना पगारे, दिपमाला पगारे, कल्पना काकडे, युवा मंचाचे अक्षय देशमुख, अॕड. जगदिश निकम, जिंतेन्द्र देवरे, नारायण मोरे, सुदाम मोरे, सचिन टकले उपस्थित होते.

याप्रसंगी “वाॕक फाॕर संविधान” रॕलीला संबोधित करतांना मा. न्यायाधीश एन. के. वाळके यांनी सांगितले की, भारतीय संविधान निरंतर टिकणारे आहे. एकदंरित भारतीय संविधान म्हणजे मानवाचा सर्वांगीन विकासाचा ठेवा डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला असुन प्रत्येकाने त्यानुसार आचरण करायला हवे. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातुन मागास घटकातील समुहाच्या मुलभुत हक्काच्या संदर्भात अनेक योजना राबविल्या जातात असे सांगितले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेतील मुल्यांवर न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधुन मुलांना माहिती दिली.

समाजकल्याण विभागाचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी प्रास्ताविक करतांना सामाजिक न्याय विभाग दि. २६ नोव्हेंबर ते दि. ६ डिसेंबर “समता पर्व” अंतर्गत वाॕक फाॕर संविधान, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथीय, तालुका स्तरावर विभागाच्या योजनांच्या संदर्भात कार्यशाळा, निबंध स्पर्धा, संविधानावर तज्ञ मान्यवरांचे व्याख्याने असे विविध कार्यक्रम साजरे करणार असल्याचे सांगितले. एक सशक्त देश घडवण्याच्या दृष्टिने संविधान समजुन उमजुन घेण्यासाठी या दृष्टीने समाजकल्याण विभाग सतत प्रयत्नशिल असल्याचे आपल्या अध्यक्षीय मनोगत विद्यालयाचे प्राचार्य एन. जी. शेलार सांगितले.

सदर रॕली “वाॕक फाॕर संविधान” गावातुन जात असतांना ठिकठिकाणी नागरिकांना संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत समाजकल्याण विभागाकडुन देण्यात आल्या. सदर कार्यक्रम सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रम हा कार्यालय अधिक्षक राजेन्द्र कांबळे यांच्या नियोजनाने यशस्वी करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुञसंचलन व्हि. एम. सानप यांनी तर उपस्थितांचे आभार पर्यवेक्षक ए. ए. जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर शितोळे, एन. व्ही. देशमुख, अक्षय देशमुख, पंजाब देशमुख, अॕड. जगदिश निकम, नारायण मोरे, राजु गवळे, संभाजी पाटील, गौतम मोरे, मनोज शिंपी यांच्या सह शिक्षक – शिक्षेकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content