साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या कर्मभूमीत अभिवादन

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | साने गुरुजींच्या स्मृती दिनानिमित्त शहरातील त्यांच्या पुतळयाजवळ शहरवासियांतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

महाराष्ट्राचे मातृहृदयी गुरुजी म्हणजे साने गुरुजी होय. अमळनेर ही साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली कर्मभूमी. शहरातील गुरुजींच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्यासाठी अमळनेरकर आले होते.

साने गुरुजींची यांची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना म्हणण्यात आली. या कार्यक्रमाला सुलोचना वाघ, नरेंद्र निकुंभ, प्रा.अशोक पवार, मुन्ना शर्मा, राजू फाफोरेकर, बन्सीलाल भागवत, डी.ए.धनगर, एस.सी.तेले, गोविंद कंखरे, रमेश पवार, रमेश देव शिरसाठ, मच्छिंद्र लांडगे, आनंदा हडप, रियाज शेख यांच्या समवेत नागरिकांची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!