शहरात अस्वलाचा मॉर्निंग वॉक

वनविभागाने बेशुद्ध करून अस्वलाला केले जेरबंद

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरात आज चांडक लेआऊट परिसरात एक भले मोठे अस्वल फेरफटका मारताना दिसले. सकाळी सकाळी परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकला बाहेर जात असतात. त्याच वेळी एक अस्वलसुद्धा अचानक मॉर्निंग वॉक करताना एका नागरिकाला दिसले.

तेव्हा त्या नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये त्याचे चित्रण केले. परिसरात अस्वल फिरत असल्याची चर्चा झाल्याने एकच गर्दी झाली. वन विभागाने टांतीने घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशन राबवून त्या अस्वलाला बेशुद्ध करून जेरबंद केले. त्यानंतर त्याला नजीकच्या ज्ञानगंगा अभयारण्यात सोडून देण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाने दिली.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!