खड्डेमय रस्ते दुरुस्तीसाठी जळगावकर एकवटले (व्हिडीओ)

1cdcda19 8909 4d47 bfcf bbeb79a9d9d6

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील खड्डेमय रस्ते, अस्वच्छता, बंद पथदिवे आदी मुलभूत समस्यांवर विविध संघटनांनी आज तीव्र भूमिका घेत महापालिकेवर मोर्चा काढला. जळगावरांनी आणखी किती दिवस त्रास सहन करायचा ? असा प्रश्‍न रोटरी क्‍लब व विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना केला.

 

जळगाव महापालिकेवर रोटरी क्‍लबच्या विविध संघटना, तसेच एमआयडीसी उद्योग विकास संघटना, राजकीय पक्षाचे मोर्चे, लेवा चेंबर ऑफ कॉमर्स – किशोर ढाके, वन्यजीव संरक्षण बहुउद्देशिय संस्था – रविंद्र फालक, एम सेक्टर उद्योजक चॅरीटेबल ट्रस्ट, जळगाव इंडस्ट्रीज असोसिएशन, लघू उद्योग भारती, भा.ज.पा. उद्योग आघाडी – चंद्रकांत बेंडाळे, युवा विकास फाउंडेशन, इंडियन रेडक्रॉस – तिवारी , जळगाव जिल्हा बार असोसिएशन, जळगाव शहर जिल्हा कॉंग्रेस कमेटी – डॉ.राधेशाम चौधरी , रोटरी क्लबच्या शहरातील ७ क्लबचे डॉ. राजेश पाटील, मोहन कुलकर्णी, उषा शर्मा, डॉ.सुनिल राणे, डॉ. राहुल मयुर, विनोद पाटील, संजय दहाड, सागर मुंदडा आदींनी या वेळी निवेदन दिले.

मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट करा :- शहरात अनेक कॉलन्या वसाहती तसेच मुख्य रस्त्यांमधून अमृत योजनेचे जलवाहिनी टाकण्यासाठी मक्तेदारा कडून कामे सुरू आहे. परंतू काम व्यवस्थित न करता तसेच खड्डे व्यवस्थित बुजविले नसल्याने जळगाव शहरात आज या अमृतच्या कामांमुळे 38 टक्के अपघातातील जखमी रुग्णांची संख्या वाढली आहे. यामुळे अमृताच्या मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी अमृत योजनेच्या खड्डयांमुळे जनता त्रस्त असून ड्रेनेजसाठी रस्त्याच्या मधोमध पुन्हा खोदले जाणार आहे याकडे लक्ष वेधले यासोबतच डॉ. राजेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, महापालिका प्रशासनासोबत पदाधिकारी, अधिकारी तसेच खासदार, आमदार यांनी शहरात काम व्यवस्थित होता ही की नाही यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. परंतू तसे होत नसल्याने आज शहराची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. नागरिक कर भरतात पण त्यांनी मुलभूत सुविधा देखील मिळत नसेल तर हे काय कामाचे. त्यामुळे महापालिका प्रशासन, आमदार, खासदार यांची लाज वाटत आहे असे डॉ. राजेश पाटील यांनी मत व्यक्त केले.

१५ दिवसात खड्डे खड्डे बुजवणार-आयुक्त :– सर्व संघटनेतर्फे निवेदन रोटरीचे अध्यक्ष डॉ. सुशील राणे दिल्यानंतर आयुक्त डॉ. उदय टेकाळे म्हणाले, की नागरिकांचा व सर्व संघटनांच्या रोष मी समजू शकतो. पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचे काम व्हायला पाहिजे होते. परंतू तसे झाले नाही. तरी अशी आता दुर्देवी घटना होवू नये साठी तातडीने सर्व रस्त्यातील खड्डे पंधरा दिवसात बुजविण्याचे काम करण्याचा प्रयत्न महापालिकेचा राहील असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.

बार असोसिएशन दिले निवेदन :- जळगाव ड्रिस्टीक बार असोसिएशन तर्फे आज आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना निवेदनात आले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. पंढरीनाथ चौधरी, उपाध्यक्ष ऍड. मंजू वाणी, सेंक्रेटरी योगेश गांवडे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी आयुक्तांना केली.

 

Protected Content