सना खानने धर्मासाठी सिनेसृष्टी सोडली

 

मुंबई- वृत्तसंस्था । बिग बॉस फेम अभिनेत्री सना खानने बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली. सोशल मीडियावर मेसेजमध्ये तिने धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. सनाआधी झायरा वसीमनेही हेच कारण देत बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला होता. झायरा ही मुळची काश्मिरी आहे.

सनाने इन्स्टाग्रामवर लिहिले की, आज मी तुमच्याशी माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलत आहे.” मी अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीचं आयुष्य जगत आहे आणि या काळात प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला प्रसिद्धी, सन्मान आणि संपत्ती सर्व काही मिळाले. ज्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे.

एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात हा विचार येऊ नये का की त्याला कधीही मरण येऊ शकतं आणि मरणानंतर त्याचं काय होईल? या दोन प्रश्नांची उत्तरं मी अनेक काळापासून शोधत आहे. विशेषतः मृत्यूनंतर माझं काय होईल याबद्दल मी अधिक विचार करते.

जेव्हा मी माझ्या धर्मात याचं उत्तर शोधलं तेव्हा मला कळलं की हे जीवन खरंतर मृत्यूनंतरचं जीवन सुधारण्यासाठी आहे. मृत्यूनंतरचं जीवन तेव्हाच सुंदर होईल जेव्हा तुम्ही निर्मात्याने सांगितलेल्या मार्गावर चालाल. पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे पळू नका. म्हणूनच मी आज सिनेसृष्टीतलं आयुष्य सोडून मानवतेच्या वाटेवर आणि अल्लाहच्या आज्ञाचं पालन करण्याचा निर्णय घेते.

Protected Content