रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे १३ कोटी रूपयांचे नुकसान

रावेर प्रतिनिधी । गेल्या महिन्यात वादळी पावसामुळे तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. शासकीय पंचनाम्यानुसार १ हजार २०४ शेतकऱ्यांचे सुमारे १३ कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचे महसूल विभागाकडून समोर आले आहे.

याबाबत वृत्त असे की, गेल्या महिन्यात १९ सप्टेंबर रोजी आलेल्या वादळी पावसामुळे रावेर तालुक्यातील ५५ गावांच्या १ हजार १४८ शेतक-यांचे ४ हजार ५६२ हेक्टर वरील मका ज्वारी केळी या पिकांचे १२ कोटी ८५ लाख ७० हजार २०० रूपयांचे नुकसान झाले आहे. तर २ ऑक्टोबर रोजी झालेल्या वादळी पावसामुळे ५६ शेतकऱ्यांचे ४४ हेक्टर वरील केळी, ऊस, ज्वारी, मक्याचे ८७ लाख ५६ हजाराचे नुकसान झाल्याचे नुकसानीच्या अंतीम अहवालातुन स्पष्ट झाले आहे. हे सर्व पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे महसूल प्रशासना कडून सांगण्यात आले.

Protected Content