मोठी बातमी : जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली; रेड्डी नवे एसपी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली झाली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्‍वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगावचे पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची बदली करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे अवघ्या काही महिन्यांमध्ये त्यांची बदली करण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्‍वर रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त आहे.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची पदोन्नतीने सोलापूर शहर पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी ३१ जानेवारी रोजी सायंकाळी दिलेल्या आदेशानुसार कळविले आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची सोलापूर येथील जिल्हा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता मुंबई येथील पोलीस उपायुक्तपदी असलेले एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची आता जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असे आदेश आता नुकतेच राज्य शासनाच्या मुख्य सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहे.

शिवाय यांच्यासह चाळीसगाव पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांची बदली पुणे येथील ग्रामीण भागातील अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यांच्या जागी आता मुंबई सायबर पोलीस अधीक्षका कविता नेरकर यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहे. दरम्यान विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी ही बदली करण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Protected Content