प्रतिज्ञापत्र सक्ती केल्यास सेतू सेवा चालकांवर कारवाई – डॉ. थोरबोले

5dc031f5 53a2 4ac5 86f3 a07ea0224ff5

फैजपूर (प्रतिनिधी) जातीचे दाखले, नॉन क्रिमीलेयर व इतर दाखले यांच्यासाठी सेतू सुविधा, महा-ई-सेवा चालक यांनी प्रतिज्ञापत्र सक्तीचे केले होते. यामुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड बसत असल्याचे लक्षात येताच फैजपुर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी प्रतिज्ञापत्र सक्ती बंद करण्याचे व अर्जदार यांचे स्वयंघोषणापत्र स्वीकारण्याचे आदेश नुकतेच काढले आहेत.

 

रावेर व यावल तालुक्यातील सेतू सुविधा चालकांना हे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे जातीचे दाखले, नॉन क्रिमेलेयर सर्टिफिकेट काढण्यासाठी नागरिकांना जास्तीच पैसे द्यावे लागत होते व ते आता फक्त ६० ते ७० रुपयांत दाखले मिळनार आहेत. त्यामुळे हे दाखले काढणे अतिशय सोपे झाले आहे. यापुढे सक्ती करणाऱ्या सेतू सुविधा, महा ई सेवा केंद्र संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येवून पाच हजार रुपये दंड आकारणी करण्यात येईल, असा आदेशही डॉ. थोरबोले यांनी दिला आहे.

Protected Content