चोपडा येथे दहा दिवसानंतर पाणीपुरवठा

water

चोपडा प्रतिनिधी । शहरामध्ये दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासना विरुद्ध नाराजीचे सुर उमटत आहेत.

नागरिकांना उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना केला आहे. त्यावेळी नागरिकांनी संयम दाखवत 18 ते 22 दिवसानंतर पाणी पुरवठा केल्यावर देखील प्रशासनाला सहकार्य केले. परंतू आता ती परिस्थिती नसतांनाही 10 दिवसानंतर पाणी पुरवठा कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. तालुक्यात वरुन राजाची कृपा झाली असून, त्याचप्रमाणे तापी नदीच्या उगमस्थळी चांगला पाऊस झाल्याने हतनूर धरणाचे काही दरवाजे उगडल्याने तापी नदी दुथडी वाहत आहे. त्यामुळे कठोरा येथुन होणा-या पाण्याचा डोह भरून वाहत असतांना नगरपालिकेने तर पावसाळा व हिवाळा या सात-आठ महीने दोन दिवसा आड पाणी पुरवठा करायला हवा. परंतू लाईन नाही, पाईप लाईन फुटली आहे, असे नेहमीचे उत्तर कर्मचा-यांनी तोंडपाठ करून ठेवले आहेत. असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

Protected Content