कोरपावलीत आदर्श विवाह; साखरपुड्याला आले अन् लग्न लावुन गेले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे सामाजिक रितीरिवाजाला फाटा देत साखरपुड्यासाठी आलेल्या पाहुण्यांनी लग्न लावून समाजात आदर्श निर्माण केला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील कोरपावली येथील फिरोज कुलकर्णी यांची कन्या सुमैय्याबी आणि जळगाव येथील इरफान पटेल यांचे चिरंजीव इमरान यांचा रविवारी २२ मे रोजी समाज रीती रिवाजा प्रमाणे साखरपुडा कोरपावली येथे आयोजीत करण्यात आला होता. परंतु नातेवाईक आणि समस्त पटेल बिरादरीच्या समाजातील जेष्ठ नागरीकांनी वधू आणि वरांच्या मंडळीं समोर साखरपुड्यात लग्न लावून देण्याचा प्रस्थाव मांडला व दोन्ही कडील मंडळींनी तो लगेच स्वीकारला.

 

या महागाईच्या युगात गोरगरीब लोकांचे अतोनात हाल होत असतांना अशा प्रकारे विवाह करून व सगळ्या गोष्टीची होत असलेली वेळ, बचत विनाकारण होणारा खर्च वाचला.  वर व वधु दोन्ही कडील मंडळी तसेच पटेल बिरादरीच्या जेष्ठ नागरीकांनी आणी युवकांनी प्रयत्नांनी साखरपुड्यात विवाह करून समाजासमोर इतर समाजासमोर देखील एक आदर्श पुढे ठेवला आहे . अगदी साध्या पद्धतीने पार पडलेल्या या विवाह ( निकाह ) येथील मस्जिद चे मौलाना शम्स तबरेज यांनी कुदबा पठण करून निकाह लावला या आदर्श विवाहाचे  माजी सरपंच जलील पटेल, कोरपावली गावातील समाजसेवक मुक्तार पटेल यांनी कौतुक करून वधु वरास व त्यांच्या नातेवाईकांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या सोबत वरपिता इरफान पटेल, वधुपिता फिरोज कुलकर्णी, हाजी हारुन पटेल, महंमद पटेल, हुसेन पटेल, मुबारक पटेल, इरफान पटेल, शरीफ पटेल, सादिक पटेल यांच्यासह पटेल समाज बांधव या आदर्श विवाह प्रसंगी उपस्थित होते.

Protected Content